इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजीनजीक पार्वती औद्योगिक वसाहतीतील कलावंत टेक्स्टाईल नामक अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्यात शॉर्टसर्कीटनं आग लागुन सुमारे दोन कोटीचं नुकसान झालं. अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी अथक परिश्रम करून ही आग आटोक्यात आणली. ही घटना 21 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
इचलकरंजीतील इम्रान आणि मोहसीन कलावंत याचा पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये अत्याधुनिक 48 यंत्रमागांचा कारखाना आहे. हा कारखाना नेहमीप्रमाणं सुरू होता. मात्र 21 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्कीटनं आग लागली. याबाबत माहिती समजताच कारखान्याचे मालक धावले. मात्र बघता बघता आगीनं कारखान्यातील संपूर्ण वायरिंग जळून यंत्रमागावरील कापड, सुतानंही पेय घेतली. आगीवर नियंत्रणासाठी इचलकरंजीन नगरपालिका, शिरोळ, जवाहर कारखाना, घोडावत गु्रप यांच्या अग्निशमन गाड्या पाचारण करण्यात आल्या.
सकाळपर्यंत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र या घटनेत 18 यंत्रमाग, त्यावरील बिमं, कापड, सुत आणि कारखान्यातील वायरिंग, सिलींग यासह सुमारे 2 कोटी रुपयांचं नुकसान झालं. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस दाखल झाले. या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.