विविध अत्याधुनिक सुविधा मिळणार :भारतीय बाजारात स्मार्टफोन दाखल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘इनफिनिक्स’ कंपनीने भारतीय बाजारात आपला पहिला 5-जी स्मार्टफोन सादर केला असून सदरच्या स्मार्टफोनचे नाव इनफिनिक्स झिरो 5-जी ठेवण्यात आले आहे. फोनमध्ये पंच होल डिझाइनसह 6.78 इंच डिस्प्लेची सुविधा मिळणार आहे.
यामध्ये रिप्रेश रेट 120 एचझेड होणार आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्ससोबत ट्रिपल कॅमेऱयाचीही सुविधा मिळणार आहे. बाजारात अगोदरपासून उपलब्ध असणाऱया रियलमी, शाओमी, वीवोच्या बजटमधील 5-जी फोनसोबत टक्कर राहणार आहे.
किमत व उपलब्धता
इनफिनिक्स झिरो मॉडेलची किमत 19,999 रुपये आहे. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी ऑनबोर्ड स्टोरेजचे एका मॉडेलमध्ये सादर करण्यात आले आहे. फोन कॉस्मिक ब्लॅक आणि स्कायलाईट ऑरेंज कलरमध्ये उपलब्ध होणार आहे. फोनची विक्री 18 फेब्रुवारी रोजी फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे.
फिचर्स ः
w स्मार्टफोनमध्ये डब्बल सिम सपोर्ट, अँड्रॉईड 11 बेस्ड एक्सओएस 10 ऑपरेटिंग सिस्टम
w फोनमध्ये 6.78 इंचाचा पूर्ण एचडी व आयपीएस डिस्प्ले मिळणार
w मीडियाटेक डायमेंसिटी 900 प्रोसेसर
wवायफाय, ब्लूटय़ूथ व्ही5, जीपीएस, ओटीजी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक