वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील दुसऱया नंबरची सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी (आयटी) इन्फोसिसचे आता 33 टक्के कर्मचारी कायमस्वरुपी घरातूनच काम करणार आहेत. कंपनीत एकूण 2 लाख 42 हजार 371 कर्मचारी कार्यरत असून यातील आता जवळपास 80 हजार कर्मचाऱयांना घरातूनच कायमस्वरुपी काम करण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे.
सामान्य स्थिती झाल्यानंतर पहिल्या सत्रात कंपनी फक्त 50 टक्के कर्मचाऱयांना कार्यालयातून काम करण्याची मान्यता देणार आहे तर अन्य कर्मचारी मात्र घरातून काम करणार आहेत. नंतरच्या कालावधीत 66 टक्के कर्मचारी कार्यालयामध्ये काम करतील आणि 33 टक्के मात्र कायमचेच घरातून काम करतील, असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.
टीसीएसची वर्क फ्रॉर्म होम योजना
लॉकडाऊन समाप्त होण्याची वाट न पाहता अनेक कंपन्यांनी आपल्या वर्क फ्रॉम होमची संकल्पना लागू करण्यास सुरुवात केली आहे. इन्फोसिसच्या अगोदर ही योजना टीसीएसने लागू केली असून त्यांचे जवळपास 75 टक्के कर्मचारी येत्या 2025 पर्यंत घरातूनच ऑफिसचे काम पाहणार आहेत. टीसीएसची कर्मचारी संख्या 4.48 लाख इतकी आहे.
इन्फोसिसचा निक्वळ नफा 6.3 टक्क्मयांनी वधारला चौथ्या तिमाहीतील अहवालाच्या माहितीनुसार कंपनीचा नफा 4,335 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. तसेच घरातून काम करण्याची सुविधा सुरु केली असल्यामुळे कंपनीच्या उत्पादनांच्या व्यवसायावर कोणताही प्रभाव पडला नसल्याचे स्पष्ट केले आहे.