कोलकाता
कोलकत्यातील एफएमसीजी कंपनी इमामी लिमिटेडने ट्रुनेटीव्ह एफ अँड बी प्रायव्हेट लिमिटेडचे अधिग्रहण केले आहे. सदरच्या कंपनीतील 19 टक्के इतका वाटा एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी इमामीने घेतला आहे. ट्रुनेटीव्ह एफ अँड बी प्रायव्हेट लिमिटेड आरोग्य आणि फिटनेस संबंधित उत्पादनांची विक्री करते. सदरचे अधिग्रहण किती किमतीला झाले आहे, याचा मात्र खुलासा करण्यात आलेला नाही.