प्रतिनिधी / बेळगाव
दिवाळी गोल्ड फेस्टिवल ऑफर अंतर्गत येथील शांतेशा मोटर्स शोरुममधून खरेदी केलेल्या सय्यद नामक ग्राहकाने 10 ग्रॅम सोन्याचे नाणे जिंकले आहे. सय्यद यांनी खरेदी केलेल्या न्यू इर्टिगा सीएनजी-पेट्रोल कार खरेदीवर त्यांना हे बक्षीस प्राप्त झाले. या न्यू इर्टिगा कारमध्ये 11 किलो सीएनजी टँकची आणि 45 लीटर पेट्रोल टँकची सुविधा उपलब्ध आहे. ही कार 26.08 किमी इतके ऍव्हरेज देते. येथील शोरुममधून विक्री होणाऱया वाहनांवर दिवाळी गोल्ड फेस्टिवल ऑफरच्या माध्यमातून विविध बक्षिसे दिली जात आहेत. प्रत्येक वाहन खरेदीवर 1 ग्रॅम गोल्ड कॉईन, 2 ग्रॅम गोल्ड कॉईन, 1,500 रुपयांपर्यंतच्या ऍसेसरीज यापैकी कोणतेही एक बक्षीस प्राप्त होत असल्याने खरेदीसाठी गर्दी होत आहे.