ऑनलाईन टीम / बेंगळूर :
बेंगळूरमधील एका नेत्ररोगतज्ज्ञाला इसिसच्या संपर्कात असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे.
अब्दुल रहमान ( वय 28) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव असून, तो बेंगळूरच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये नेत्ररोगतज्ज्ञ आहे. कटकारस्थान रचने आणि दहशतवाद्यांची मदत करणे असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. तसेच तो इसिससह इस्लामिक स्टेट खोरासान प्रोविन्सच्याही संपर्कात असल्याची माहिती समोर आली असून, एनआयए याबाबतचा तपास करत आहे.
आयएसकेपीशी संबधित कश्मीरच्या जहांजेब सामी आणि हिना बशीर या पती-पत्नीला मार्च 2020 मध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती. त्यांच्या रहमान संपर्कात होता. इसिसच्या घातपाती कारवायांसाठी त्याने मेसेजिंग प्लॅटफॉर्म बनवण्याची योजना आखली होती. तसेच मेडकल ॲप आणि दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवण्याबाबतचे ॲप विकसित करण्याचा प्रक्रियेतही रहमान कार्यरत होता. रहमानने सिरीयाचा दौरा केल्याचेही तपासात आढळले आहे.