ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या इस्लामाबादेतील भारतीय दूतावासात एक ड्रोन सापडला आहे. भारताने या प्रकरणावर जोरदार आक्षेप घेत सुरक्षा उल्लंघनाबद्दल निषेध नोंदविला आहे. मात्र, पाकिस्तानने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
दरम्यान, आज पहाटे 4.25 वाजता पाकिस्तानी ड्रोन जम्मू-काश्मीरच्या आर्निया सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत होता. बीएसएफच्या सतर्क जवानांनी 20 ते 25 राऊंड फायर केल्यानंतर हा ड्रोन परतला.