नवी दिल्ली
जुलै 2020 मध्ये दंडात्मक कारवाईसंबंधीचा नवा नियम केंद्राने आणल्यानंतर आता इ-कॉमर्स क्षेत्रातील तक्रारींचे जलद निवारण होताना दिसते आहे. यापूर्वी इ-कॉमर्स कंपन्यांविरूद्धच्या तक्रारींचे निवारण त्वरेने पेले जात नसल्याच्या तक्रारी सरकारकडे पोहचल्या होत्या. गेल्या वर्षभरात इ-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांच्या ऑनलाइन व्यवहारांमध्ये तेजी दिसली आहे. त्यामुळे दरम्य़ानच्या काळात तक्रारी वाढल्याचे दिसून आले होते. पण नव्या नियमाची अधिसूचना जारी होताच तक्रारींचे निवारण त्वरेने करण्यावर कंपन्या भर देत असल्याचे दिसून आले आहे. तक्रारींच्या प्रमाणातही घट झाली आहे.