इंफाळ / वृत्तसंस्था
म्यानमार-भारत सीमेजवळच्या भागाला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के बसले. बांगलादेशच्या चटगावपासून 175 किमी पूर्वेला 6.3 रिश्टर स्केलचा मोठा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती युरोपीय-भूमध्य भूकंप केंद्राने शुक्रवारी दिली. या भूकंपाचे झटके भारतामधील पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामपर्यंत जाणवले. तसेच शुक्रवारी ईशान्येकडील राज्यांपैकी एक असणाऱया मिझोराममध्येही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दुसरीकडे नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने देलेल्या माहितीनुसार मिझोरामच्या थेनवॉलपासून 73 किमी दूर दक्षिण-पूर्वमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला आहे.