ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात काही प्रमाणात रुग्ण संख्या आणि मृत्यूच्या संख्येत किंचित घट पाहायला मिळत आहे. मागील 24 तासात 271 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 18 रुग्णांचा मृत्यू झाला. तर कालच्या दिवसात 515 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 16,180 नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर प्रदेशात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 37 हजार 449 इतकी झाली आहे. यातील 3 लाख 21 हजार 064 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सद्य स्थितीत प्रदेशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.14 % इतके आहे. तर सक्रिय रुग्णांमध्ये घट झाली असून 3,642 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 6,985 (2.07%) जणांचा मृत्यू झाला आहे.