ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडचे शहरी विकास मंत्री मदन कौशिक यांचे एंटीजन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ते लवकरच एम्स रुग्णालयात दाखल होणार आहेत. त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, जे लोक आणि पत्रकार माझ्या संपर्कात आले होते, त्यांनी स्वतः हून आयसोलेट व्हावे. तर दुसरीकडे कृषी मंत्री सुबोध उनियाल हे देखील सेल्फ आयसोलेट झाले आहेत. त्यांचा मुलगा आणि भाचीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री कौशिक हे काल पासूनच 5 दिवसांसाठी आयसोलेट झाले आहेत. याआधी मंत्र्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच मायादेवी मंदिरात झालेल्या हवन कार्यक्रमात सहभागी झाले होते.