ऑनलाईन टीम/ देहरादून :
उत्तराखंड प्रदेशातील हरिद्वार, नैनिताल आणि ऊधमसिंह नगर या तीन जिल्ह्यात या आठवड्यातील शनिवार- रविवारी लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. तर देहरादून बाबत आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल.
कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी यात चार जिल्ह्यात लोक डाऊन ठेवले होते. त्यावेळी हा निर्णय केवळ एका आठवड्यासाठी घेण्यात आला होता.
त्यावेळी सांगितले होते की, पुढील आठवड्याची स्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हरिद्वार, नैनिताल आणि ऊधमसिंह नगर या तीन जिल्ह्यात या शनिवार-रविवारी लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. देहरादून बाबत संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल.
याबाबत अधिक माहिती देताना उत्तराखंडचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंह यांनी सांगितले की, सर्व जिल्ह्यांकडून कोरोना परिस्थितीबाबतचे रिपोर्ट मागवण्यात आले होते. त्या रिपोर्टची समीक्षा केल्यानंतर हरिद्वार, नैनिताल आणि ऊधमसिंह नगर या जिल्ह्यात या शनिवार-रविवारी लॉक डाऊन जारी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.