प्रतिनिधी /बेळगाव
खादरवाडी क्रॉस-उद्यमबाग येथील एक युवक गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्याच्या बहिणीने उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गजानन शिवाजीराव करंबळकर (वय 38) असे त्याचे नाव आहे. डिसेंबर 2021 पासून तो बेपत्ता आहे. त्याच्या पत्नीने कौटुंबिक न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केला आहे. या मनस्तापातून तो घर सोडून गेला होता. अधूनमधून घरी येत होता.
गेल्या चार महिन्यांपासून घरी परतला नाही. 5 फूट 4 इंच उंची, अंगाने साधारण, गहू वर्ण असे त्याचे वर्णन आहे. तो कन्नड, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा बोलतो. वरील वर्णनाच्या तरुणाविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405238 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.