नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून रशिया युपेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून भारतीय वैद्यकीय शिक्षणातील त्रुटी आणि अन्य समस्यांवर प्रकाशझोत पडला आहे. युद्धाचा परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवरही झाला आहे. त्यानंतर आता वैद्यकीय शिक्षणाच्या चांगल्या सुविधा देशातच मिळाव्यात यासाठी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच भारतात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार अशी माहिती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून दिली आहे. महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सीपी गुरनानी यांना त्यांनी टॅग केले आहे.
भारतातून मेडिकलचे शिक्षण घेणाऱयांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, प्रवेश घेणाऱयांच्या तुलनेत जागांची संख्या बरीच कमी असल्यामुळे कित्येक जण प्रवेशापासून वंचित राहतात. तसेच, बरेचसे विद्यार्थी पैशांच्या कमतरतेमुळे वैद्यकीय शिक्षणासाठी रशिया युपेनसारख्या देशांची निवड करतात. या सगळय़ा समस्यांच्या गर्तेत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नक्कीच त्याचा लाभ भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच इच्छुक विद्यार्थ्यांना मायदेशातच वैद्यकीय शिक्षणाची द्वारे खुली होतील.