प्रतिनिधी/इस्लामपूर
उद्योजक व राजारामबापू पाटील सह.साखर कारखान्याचे संचालक आनंदराव दत्तू पाटील(५८) यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. शामराव आनंदराव जगताप(५५,रा.शास्त्री चौक, इस्लामपूर) असे आरोपीचे नाव आहे.
पाटील यांचा ‘प्रतीक’ नावाचा बंगला व पेट्रोल पंप वाघवाडी रस्त्याला समोरासमोर आहे. ते सोमवारी दुपारी रस्ता ओलांडून पायी आपल्या बंगल्याकडे निघाले होते. दरम्यान इस्लामपूर कडून वाघवाडी फाट्याकडे चाललेल्या अल्टो कारने त्यांना जोराची धडक दिली.यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पाटील यांना हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्यांचे निधन झाले. दरम्यान कार चालक जगताप याने कारसह वाघवाडीकडे पोबारा केला.पोलीस व नागरिकांनी पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले.मंगळवारी जगताप याला न्यायालयात हजर केले. त्यास दोन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.