मार्च, एप्रिल आणि मे हे महिने कडक उन्हाचे आणि परीक्षांचे. धूळ, धूर, मातीचे बारीक कण आणि वाढत्या उन्हामुळे डोळय़ांचा त्रास कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे व थंड पाण्याने डोळे दिवसातून 4-5 वेळा स्वच्छ करावेत, असा सल्ला नेत्रतज्ञांनी दिला आहे.
वसंत ऋतूमध्ये झाडांची पानगळ सुरू होते. हळूहळू उन्हाचा कडाका आणि मग डोळय़ांच्या तक्रारींनाही सुरुवात होते. उन्हाळय़ात प्रामुख्याने डोळय़ांना होणारे त्रास- अतिनील किरणांमुळे पारदर्शक पटलास व नेत्रपटलास इजा होते. पारदर्शक पटलास होणाऱया इजेला फोटोकेराटिटिस असे म्हणतात. यामध्ये डोळा दुखणे, डोळय़ातून पाणी येणे, डोळा लाल होणे या समस्या प्रामुख्याने जाणवतात. डोळय़ांना जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी तज्ञांना दाखवून तातडीने उपचार करून घेणे आवश्यक आहे.
आपल्या चेहऱयाला खुलून दिसतील, असेच गॉगल तसेच चष्म्यांच्या प्रेम निवडा. यामुळे आपला चेहरा अधिक खुलून दिसतो. जर प्रेमची निवड चुकली, तर आपल्यालाच आपला चेहरा विचित्र वाटू लागतो. म्हणून प्रेम निवडताना नेहमी काळजी घ्यावी, त्यामुळे आपणच आपलं हसू होण्यापासून आपल्याला टाळू शकतो.
आपल्या चेहऱयाच्या त्वचेनुसार योग्य रंगाच्या प्रेमची निवड करा. हलका गोल्डन, काळा, ब्राऊन रंगाची प्रेम चांगली दिसते. पण पांढरा आणि सिल्वर रंग भडक दिसतो. तसेच गडद निळी प्रेम चेहऱयावरील डाग लपवण्यात मदत करते. लाल प्रेम चंकी-फंकी असल्यामुळे नेहमी वापरणे योग्य ठरणार नाही. ओव्हल प्रेम ओव्हल चेह-यावर सूट करत नाही. स्क्वेअर चेहऱयासाठी राऊंड प्रेम असलेले गॉगल्स छान दिसतात. तसेच राऊंड किंवा ओव्हल शेप चेहऱयासाठी स्क्वेअर प्रेम सूट करेल. गॉगल्सच्या मधला भाग नाकावर येत असेल, तर अशा गॉगल्समध्ये चेहरा लांब दिसतो. अशात गाल आणि डोळय़ांचा काही भाग दिसत असतो. अशी प्रेम लहान चेहरा असणाऱयांसाठी योग्य असते. जेव्हा गॉगल्सच्या मधला भाग ग्लासेसच्या अगदी मधोमध असल्यास लांब चेहरा लहान दिसतो. हा भाग खाली असल्यासही चेहरा लहान दिसतो.
लांब चेहरा असल्यास ही प्रेम सूट करते. मोठय़ा प्रेमचे सनग्लासेस फॅशनमध्ये असले तरी आपण गॉगल्सचा आकार आपल्या चेहऱयाप्रमाणे निवडावा. फॅशन म्हणून सामान्य चेहऱयावर मोठे गॉगल्स लावल्याने पूर्ण चेहरा झाकला जातो. गॉगल्स लावल्यावर आपले नाक खेचले जात असेल, तर हा आकार आपल्यासाठी योग्य नाही. आपण जरा मोठय़ा आकाराचा गॉगल निवडायला हवा.
गॉगल वापराच
टोपी, स्कार्फ आणि गॉगल या गोष्टी सध्याच्या उन्हाळय़ात अगदी आवश्यक आहेत.
हल्ली रस्त्यावर पन्नास- साठ रुपयांपासून गॉगल विकत मिळतात. पण या गॉगलच्या दर्जाची हमी नसते. त्यांच्या काचांची जाडी कमी-जास्त असण्याची शक्मयता असते. त्यामुळे फार महागाचा गॉगल घेतला नाही तरी किमान त्याचा दर्जा तपासून तो खरेदी करा. उष्णता वाढू नये यासाठी एखादा लहानसा कांदा खिशात ठेवला तर उत्तम. कांदा उष्णता शोषून घेणारा असल्यामुळे पूर्वी अनेक जण टोपीत कांदा आवर्जून ठेवत असत.
डोळय़ांची काळजी घ्या
दिवसातून एक-दोन वेळा तरी काम थांबवून डोळे मिटून पाच मिनिटे शांत बसा. यामुळे डोळय़ांवरचा ताण दूर व्हायला मदत होईल. डोळे चुरचुरणे आणि लाल होण्याचा त्रास असेल तर अशा प्रकारे डोळय़ांना विश्रांती देणे फायदेशीर ठरते.
थंड पाण्यात भिजवलेल्या कापडाची पट्टी डोळय़ांवर ठेवूनही बरे वाटते. हा उपाय कार्यालयात असतानाही करता येऊ शकेल.
रात्री झोपताना डोळय़ांवर काकडीच्या चकत्या किंवा दुधात भिजवलेल्या कापडाच्या घडय़ा ठेवून झोपा.
दिवसभर दर दीड-दोन तासांनी डोळय़ांवर व चेहऱयावर पाण्याचा हबका मारा. दिवसातून एकदा किंवा रात्री झोपण्यापूर्वी गुलाबपाण्याने अथवा गार पाण्याने डोळे धुवा.