अभिनेत्रीने सांगितले यामागील कारण
‘कसौटी जिंदगी की’ या प्रसिद्ध हिंदी मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारलेली उर्वशी ढोलकिया पुढील काळात नकारात्मक धाटणीच्या भूमिका करताना दिसून आली. तेव्हापासून उर्वशरीला टीव्हीवरील सर्वोत्कृष्ट खलनायिका मानले जाते. याचबरोबर तिने ‘नागिन 6’सह अनेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.
परंतु नकारात्मक भूमिकांचा शिक्का बसल्याने मला अन्य कुठल्याही प्रकारच्या भूमिका मिळणे बंद झाले आहे. कुठल्यातरी दिवशी कुणी मला वेगळय़ा दृष्टीकोनातून पाहिल अशी अपेक्षा असल्याचे उर्वशीने म्हटले आहे.
मी केवळ नकारात्मक भूमिका केलेल्या नाहीत. प्रेक्षकांनी मला ‘कॉमेडी सर्कस’, ‘देख भाई देख’, ‘जमाना बदल गया’, कभी सौतन कभी सहेली’, ‘बिग बॉस’, ‘नच बलिए’मध्ये देखील पाहिले आहे. सकारात्मक भूमिकांमध्येही लोक माझ्यावर प्रेम करतील असा विश्वास असल्याचे ती सांगते. मी सुमारे 38 वर्षांपासून अभिनयाच्या क्षेत्रात काम करत आहे. परंतु अद्याप काम मिळविण्यासाठी संघर्ष करत असल्याचे तिचे सांगणे आहे.