सूरज बडजात्या सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘ऊंचाई’वरून चर्चेत आहेत. बडजात्या यावेळी स्वतःच्या थीमला बाजूला सारून काही तरी नवे सादर करणार आहेत. हा चित्रपट फॅमिली ड्रामा नव्हे तर मैत्रीवर आधारित असणार आहे. ऊंचाई चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, डॅनी आणि परिणीति चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत.
चित्रपटात परिणीती एका टूरिस्ट गाईडची व्यक्तिरेखा साकारणा आहे. अमिताभ बच्चन यांच्यासह उर्वरित कलाकारांना नेपाळची सैर घडवून आणताना ती दिसेल. या चित्रपटातील सर्वच व्यक्तिरेखा उत्तमप्रकारे पटकथेत गुंफण्यात आल्या आहेत. यामुळे हा चित्रपट पाहणे मजेशीर ठरणार असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे.
चित्रपटाचे नेपाळमध्ये चित्रिकरण केले जात आहे. काठमांडूत 4 ऑक्टोबरपासून चित्रिकरण सुरू झाले आहे. चित्रपटाचे चित्रिकरण एव्हरेस्ट बेस कँपनजीक निर्माण झालेल्या लूकला विमानतळावर होणार आहे. हा जगातील सर्वात धोकादायक विमानतळ मानला जातो. पण अमिताभ बच्चन आणि डॅनी येथे चित्रिकरण करणार नसल्याचे सूरज यांनी सांगितले आहे.