सांगली / प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दिनांक 30 जुलै 2021 रोजी सकाळी 10.30 वा. दुधगाव ता. मिरज येथे आगमन व पुरामुळे झालेल्या विद्युत विभागाच्या नुकसानीची पाहणी त्यानंतर सकाळी 11 वा. कवठे पिरान ता. मिरज येथील पुरामुळे झालेल्या विद्युत विभागाच्या नुकसानीची पाहणी. सकाळी 11.45 वा. शेरी नाला सांगली येथे पुरामुळे विद्युत विभागाच्या नुकसानीची पाहणी. 12.15 वा. पूरग्रस्त गरजवंतांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार. दुपारी 1 ते 1.30 पर्यंत सांगली शासकीय विश्रामगृह येथे राखीव असून यानंतर दुपारी 2 वा. पत्रकार परिषद स्थळ – सांगली शासकीय विश्रामगृह. दुपारी 2.30 वा. सांगली शासकीय विश्रामगृह येथून कोल्हापूरकडे जाणार.