ऑनलाईन टीम / पुणे :
ऋत्विक फाउंडेशन यांच्या वतीने ‘स्वरानुभूती’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवार २६ जानेवारी रोजी कोथरूड येथील ऋत्विक फाउंडेशनच्या सभागृहात सकाळी ९ वाजता करण्यात आले असल्याची माहिती ऋत्विक फाउंडेशनचे संस्थापक प्रवीण कडले यांनी दिली.
ऋत्विक फाउंडेशनच्या वतीने सातत्त्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीपासून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘स्वरानुभूती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक वेळेस कला क्षेत्रातील दिग्गज मंडळी आपला कलाविष्कार सादर करणार आहेत.
यावेळी किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. जयतीर्थ मेवूंडी हे गायन सादर करणार असून त्यांना तबल्यावर भारत कामत, सारंगीवर फारुखलतीफ खांन तर संवादिनीवर मानसी महाजन साथसंगत करणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत व खुला असल्याने सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.