वृत्तसंस्था/ ऍडलेड
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या ऍडलेड खुल्या आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत सोमवारी ग्रीकच्या सहाव्या मानांकित मारिया सॅकेरीने एकेरीत विजयी सलामी देताना स्लोव्हेनियाच्या झिडान्सेकचा पराभव केला. सोमवारी या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात ग्रीकच्या सॅकेरीने झिडान्सेकचा 6-2, 0-6, 6-4 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. सॅकेरीला या सामन्यात विजयासाठी चांगलेच झगडावे लागले. सॅकेरीने गेल्यावर्षी प्रेंच आणि अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. 17 जानेवारीपासून मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत असून ऍडलेडची स्पर्धा ही शेवटची सरावाची स्पर्धा महणून ओळखली जाते