वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मोबाईल फोन निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी म्हणून ओळख असणारी कंपनी ऍपल आपल्या मुख्य तीन कॉन्ट्रक्ट सप्लायर्समार्फत देशामध्ये जवळपास 6,500 कोटी रुपये गुंतवण्याच्या तयारीत असल्याचे समजते. सदरची गुंतवणूक ही आगामी पाच वर्षांमध्ये होणार असल्याचेही यावेळी सांगितले आहे.
ऍपलची ही गुंतवणुक नवीन प्रोडक्शन लिंकड इंसेंटिव्ह (पीएलआय) योजनेच्या अंतर्गत होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऍपलच्या आघाडीवरच्या कॉक्ट्रक्ट सप्लायरमध्ये प्रामुख्याने फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन यांचा समावेश होतो. या सर्व कंपन्या एकत्रितपणे पीएलआय योजनेच्या अंतर्गत ही गुंतवणूक करणार आहेत. देशामध्ये 5.65 अब्ज डॉलरची पीएलआय योजना कंपन्यांनी सुरु केली आहे. यामध्ये कॅश इन्सेटिव्ह योजना असून ज्यामध्ये कोणत्याही स्थानिक पातळीवर निर्माण करण्यात आलेल्या स्मार्टफोनच्या विक्रीच्या वाढीसाठी प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन लाख फोन प्रति महिना
विस्ट्रॉनकडून प्रत्येक महिन्याला जवळपास दोन लाख फोन्सची निर्मिती प्रत्येक महिन्याला करणार असून हा आकडा वाढवत नेत पुढे चार लाखावर नेला जाईल.
फॉक्सकॉन 4 हजार कोटी गुंतवणार
फॉक्सकॉनने जवळपास 4 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना बनवली आहे. ज्यामध्ये विस्ट्रॉन 1,300 आणि पेगाट्रॉन यांच्याकडून 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती आहे.