पुरवठय़ासाठी 100 ट्रक्सची खरेदी : 4 शहरात पायलट प्रकल्प
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) आणि ब्रिटनची ब्रिटिश पेट्रोलियम(बीपी) पीएलसी यांची संयुक्त कंपनी रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड 2021 पासून फ्यूल ऑन डिमांड सेवा सुरु करण्याची योजना बनवत आहे. यासोबतच डिझेलची डोरस्टेप डिलिव्हरीची योजना सुरू होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
रिलायन्स बीपी मोबिलिटीची स्थापना जुलै 2020 मध्ये केली आहे. ही कंपनी जिओ बीपी ब्रँड बोर्डासह काम करत आहे. तसेच रिलायन्स मोठय़ा प्रमाणात ऑन डिमांड फ्यूल डिलिव्हरीची योजना बनवत आहे. यांच्यासाठी कंपनीने 100 ट्रक्सची खरेदी केली आहे. यांची कार्यवाही नवीन वर्षापासून होणार असल्याचे संकेत आहेत.
पायलट प्रकल्पाची रचना
रिलायन्स आपली डोरस्टेप डिलिव्हरी सेवेची सुरुवात करत असताना पायलट प्रकल्पाची सुरुवात करताना चार शहरांमध्ये साखळी तयार केली आहे. ज्यामध्ये बेंगळूर, नोएडा कोलकाता आणि गुजरातमधील शहराचा समावेश आहे.
आरआयएल आणि बीपी हे आपल्या रिटेल आउटलेटचा विस्तार करणार असून त्य़ांची संख्या 1400 नी वाढवून 5000 करण्याची योजना आखत आहे. ज्यामध्ये सरकार पेट्रोल आणि सीएनजी मोबाईल फ्यूल रिटेलिंगला मंजुरी देणार आहे.
फ्यूलची होम डिलिव्हरी
चालू वर्षातील जुलैमध्ये सरकारी तेल व्यापारी कंपन्यांनी फ्यूल ऑन डिमांड सेवा सुरु केली आहे. यासाठी स्टार्टअप्सची एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (इओआय) मागणी केली होती. ज्यामध्ये फक्त 500 पेक्षा जादाचे इओआय जमा झाले आहेत. यामध्ये सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा समावेश राहणार आहे. यात आरआयएल आणि बीपी हे स्वतःही सेवा सुरु करणार आहेत.