ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीसह देशभरातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिल्लीत एकट्या कार चालकालाही मास्क बंधनकारक केला आहे. मास्क न घातल्याबद्दल एकट्या कार चालकावर दंड आकारण्याच्या दिल्ली सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी रिट याचिका फेटाळून लावत न्यायमूर्ती प्रतिभा सिंग यांच्या एकाच खंडपीठाने हा निर्णय दिला.
न्यायालयाने म्हटले आहे की, मास्क हे संरक्षण कवचासारखे आहे. जे परिधान करणाऱ्याचे आणि आजूबाजूच्या इतर लोकांचेही संरक्षण करते. त्यामुळे दिल्लीत यापुढे प्रत्येक व्यक्तीला मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. एखादी व्यक्ती गाडीतून एकटी प्रवास करत असेल तरी देखील त्या व्यक्तीला मास्क परिधान करावे लागेल.