वार्ताहर/ एकसंबा
मंगळवारी एकसंबा परिसराला पावसाचा मोठा तडाखा बसला. सायंकाळच्या पावसामुळे आंबेडकर नगरमधील रस्त्यांना चक्क नदीचे स्वरूप आले होते. यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. तसेच पिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने पुन्हा एकदा कहरच केला आहे. एकसंबा परिसरातून वाहणारे छोटे-मोठे नाले तुडूंब भरून वाहत होते. अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी रस्त्यांवरून वाहत होते. एकसंबा – उळागड्डीवाडी रोड व एकसंबा – अंकली मार्गावरून शेतातील पाणी मोठय़ा प्रमाणात लेंडूरीत येत होते. यामुळे आंबेडकरनगर भागातील रस्ता जलमय झाला होता. तसेच या भागातील अनेकांच्या घरात पाणी देखील शिरले आहे. गतवषी 23 जून रोजी अशाच पावसाने या भागात प्रचंड हानी झाली होती.