ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
सीबीआयने एनएसई प्रकरणाच्या तपासात लक्षणीय प्रगती केली आहे असे अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी सांगितले. बाजार नियामक असणाऱ्या सेबीतील काही माजी उच्चस्तरीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्टॉक एक्सचेंज तसेच सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे.
राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात मंत्री म्हणाले की,NSE सह-स्थानाबाबत सरकार आणि सेबीकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान असे लक्षात आले की काही स्टॉक ब्रोकर्सना ट्रेडिंग सिस्टममध्ये प्राधान्याने प्रवेश मिळाला आहे.
“सीबीआयने या प्रकरणी 2018 साली भारतीय दंड संहिता, 1860, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हाही नोंदवला आहे. सीबीआयचा तपास अजूनही सुरू आहे. सीबीआयने माहिती दिली आहे की, या प्रकरणाच्या तपासात उत्तरोत्तर प्रगती होत आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.
अर्थमंत्र्यांनी असेही सांगितले की या संदर्भात त्रुटींसाठी, एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उच्च अधिकारी सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन्स) स्टॉक एक्स्चेंज आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन) नियम, 2012 च्या संबंधित तरतुदींच्या उल्लंघनासाठी जबाबदार असून त्यांच्यावर आर्थिक दंड आणि इतर निर्बंध लादण्यात आले आहेत.