नवी दिल्ली : बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेते परेश रावल यांना नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील भाजपचे माजी खासदार रावल यांची या पदावर वर्णी लावली आहे. रावल यांची ही नियुक्ती 4 वर्षांसाठी असणार आहे. हे पद 2017 पासून रिक्त होते. केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी रावल यांना एनएसडी अध्यक्ष झाल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. रावल यांच्या प्रतिभेचा लाभ देशातील कलाकार आणि विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. एनएसडीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही ट्विट करत स्वतःच्या नव्या अध्यक्षांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. एनएसडीचा परिवार या दिग्गजाचे स्वागत करतो, रावल यांनी स्वतःच्या मार्गदर्शनात एनएसडीला नव्या उंचीवर पोहोचवावे असे ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. 65 वर्षीय परेश रावल हे चित्रपट तसेच नाटय़सृष्टीतील अनुभवी तसेच लोकप्रिय कलाकार आहेत.
Previous Articleपैशुन्यं साहसं द्रोहम्…..(सुवचने)
Next Article खादी ई-मार्केट पोर्टलवर 180 पेक्षा अधिक उत्पादने
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.