वार्ताहर/ अगसगे
विकेंड कर्फ्युमुळे बेळगाव मार्केट यार्डमध्ये शनिवारच्या बाजारात भाज्याच्या भावात पुन्हा घसरण झाली आहे. व कोथिंबीर मात्र शेकडा दोनशे रुपयांनी वाढ झाली असून कांदा बटाटय़ाचा भाव स्थिर काहे. तर बेळगाव बटाटा विक्रीसाठी दाखल झाला.
बेळगाव तालुक्यातील जवारी बटाटा आवक शनिवारी होती. शनिवारी पन्नास पोती जवारी बटाटा आवक झाली होती. महाराष्ट्रातून 37 ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता. इंदौर बटाटय़ाच्या सात ट्रका हासन बटाटय़ाच्या बारा ट्रक आवक झाली होती. कांदा बटाटय़ाचा भाव प्रति क्लिंटल स्थिर आहे. तर शनिवार रविवार विकेंड कर्फ्यू असल्यामुळे भाजी खरेदीसाठी खरेदीदार कमी आल्याने भाजीलला मागणी कमी झाल्याने भाज्याचे भाव प्रती 10 किलोला व शेकडय़ाला 50 ते 200 रुपयापर्यंत घसरले आहेत. अशी माहिती भाजी व्यापारी भैरु कंग्राळकर यांनी दिली आहे.