बागायत खात्याचा उपक्रम : बागायतदार, विपेत्यांना ठरणार फायदेशीर
प्रतिनिधी /बेळगाव
चांगल्या जातीच्या आंब्यांची विक्री व्हावी, याकरिता बागायत खात्यामार्फत दरवषी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. कोरोनामुळे दोन वर्षे स्थगित झालेला आंबा महोत्सव एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात होणार आहे. त्यामुळे आंबे खवय्यांना एकाच छताखाली विविध जातीच्या आंब्यांची खरेदी करता येणार आहे.
बागायत खात्यामार्फत हय़ूम पार्क येथे आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवात विविध जातीचे आंबे विक्रीसाठी ठेवले जातात. यामध्ये हापूस, केसरी, जवारी, आम्रपाली, पायरी, लिली, तोतापुरी आदी जातींच्या आंब्यांचा समावेश असतो. मात्र गत दोन वर्षांत कोरोनामुळे आंबा महोत्सवाला ब्रेक लागला होता. मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने बागायत खात्याने आंबा महोत्सव भरविण्यासाठी तयारी चालविली आहे.
अनेक विपेत्यांचे आंबा महोत्सवाकडे लक्ष
आंबा महोत्सवाला खवय्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो. यामुळे 2018 ला तब्बल 70 टन तर 2019 च्या आंबा महोत्सवात 97 टन आंब्यांची विक्री झाली होती. त्यामुळे अनेक बागायतदारांना, विपेत्यांना आंबा महोत्सव फायदेशीर ठरत आहे. कोरोना काळात खात्याने ऑनलाईन आंबा विक्री उपक्रम सुरू केला होता. मात्र यालादेखील म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अनेक विपेत्यांचे लक्ष आंबा महोत्सवाकडे लागले आहे. एप्रिल महिना अखेरीस आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती बागायत खात्याने दिली आहे.
परवानगीनंतर भरविणार महोत्सव
आंबा महोत्सव भरविण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. यासाठी अर्ज दाखल केला आहे. रितसर परवानगी मिळाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात आंबा महोत्सव भरविला जाणार आहे.
-महांतेश मुरगोड (उपनिर्देशक बागायत खाते)