अहवालात माहिती : विविध कंपन्या स्पर्धेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मसाला बनविणाऱया एमडीएच स्पाइसेस (MDH Spices) कंपनीची विक्री होण्याचे संकेत आहेत. प्राप्त अहवालातील माहितीनुसार देशातील दिग्गज एफएमसीजी (FMCG) कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरसह अन्य कंपन्या या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. या बातमीने हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग घसरणीत राहिले होते. कंपनीचे समभाग तेजीसोबत प्रारंभी राहिले होते परंतु नंतर यामध्ये चार टक्क्यांची घसरण राहिली होते. अधिकची बहुतांश हिस्सेदारी खरेदी करण्यात हिंदुस्थान युनिलिव्हर ही कंपनी सर्वात पुढे राहणार आहे. एमडीएचचा व्यवहार 10,000 ते 15,000 कोटी रुपयापर्यंत होण्याचे संकेत आहेत.
कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी यांच्या निधनानंतर एमडीएचने काही अन्य कंपन्यांसोबत चर्चा केली आहे. मात्र या संदर्भात कोणताही खुलासा केलेला नाही.
कोण होते धर्मपाल गुलाटी
एचडीएच कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे डिसेंबर 2020 मध्ये दिल्ली येथे निधन झाले होते. त्यांची मसाला किंग म्हणून ओळख होती. गुलाटी यांना 2019 मध्ये देशातील तिसरा सर्वात मोठा पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांचा जन्म 27 मार्च 1923 रोजी सियालकोट (सध्याचे पाकिस्तान) येथे झाला होता.