प्रतिनिधी/ रत्नागिरी
एलईडी दिव्यांच्या सहाय्याने अनधिकृतपणे मासेमारी करणाऱया नौकेवर मंगळवारी रात्री मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली आह़े मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास झालेल्या या कारवाईत नौकेवर एलईडी दिवे सापडले आहेत, मात्र त्यावर मासे आढळून आले नाहीत.
रत्नागिरीच्या सागरी क्षेत्रामध्ये मंगळवारी रात्री 11च्या सुमारास स्थानिक नागरीकांनी एक नौका एलईडीच्या सहाय्याने मासेमारी करत असल्याचे मत्स्यविभागाला कळवल़े या तक्रारीची दखल घेऊन मत्स्यविभागाने ‘भैरीभवानी’ नावाची ही नौका ताब्यात घेतल़ी ही नौका पूजा प्रकाश सावंत ऱा मिऱया, रत्नागिरी यांच्या मालकीची असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
मत्स्यविभागाच्या अधिकऱयांनी अधिक तपासणी केली असता, या नौकेवर एक जनरेटर आढळून आला. मात्र कोणत्याही प्रकारचे एलईडी दिवे व मासळी आढळून आली नाही अशी माहीती मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव यांनी दिल़ी भैरी भवानी ही नौका ताब्यात घेण्यात आली आह़े या नौकेचा पंचनामा चालू असून पुढील योग्य ती कारवाही तहसीलदार करणार आहेत़
काही दिवासांपूर्वीच तामीळनाडू येथील अनधिकृत नौकांवर मत्स्यविभागाने धडक कारवाई केली होत़ी या धडक कारवाईमुळे एलईडी, पर्ससीन जाळ्याव्दारे मासेमारी करणाऱया मच्छिमारांनीसुध्दा चांगलाच धसका घेतला आह़े अशीच कारवाई करण्याची मागणी पारंपरीक मच्छिमार करत आहेत़