नवी दिल्ली
स्वयंपाकाच्या एलपीजी गॅसचा वापर दिवसेंदिवस वाढतोच आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये गॅसचा वापर 7 टक्के इतका वाढला आहे. सिलेंडरच्या किंमतीत वाढ होऊनही सिलेंडर गॅसचा वापर वाढलेला आहे. आयओसीने सांगितले की, सिलेंडरच्या किंमती अलीकडे वाढलेल्या असल्या तरी सिलेंडरच्या मागणीत घटलेली नाही. सिलेंडर वापराचे प्रमाण 3 महिन्यात 7 टक्के वाढले आहे. 2016 पासून आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये 8 कोटी गरिबांना मोफत सिलेंडर उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात आला आहे.