प्रतिनिधी / बेळगाव
ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी ऑक्सिजन युनिटला भेट देवून ऑक्सिजन साठा करण्याची क्षमता आणि इतर घटकांविषयाची चर्चा त्यांनी केली. यावेळी बेळगाव ऑक्सिजन प्रा. लि. चे. कार्यकारी संचालक वेंकटेश यांनी त्यांना माहिती दिली.
ऑक्सिजन पुरवठा पुरेसा व्हावा आणि तो वेळेवर रुग्णालयात पोहोचावा यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टिने जिल्हाधिकाऱयांनी ऑक्सिजन युनिटला भेट देवून संपूर्ण माहिती घेतली. नोडल अधिकाऱयांनी तयार केलेली ऑक्सिजन पुरवठा यादी तसेच इतर कागदपत्रांची पाहणीदेखील त्यांनी केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत ऑक्सिजन पुरवठा कसा करता येईल, याकडे अधिकाऱयांनी लक्ष देण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.
ऑक्सिजन युनिटबाबत माहिती घेतल्यानंतर होत असलेल्या पुरवठय़ाबाबत सर्वच अधिकाऱयांशी चर्चा केली. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करुन सर्वांनी रुग्णांना मदत करावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांच्या सोबत अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, जिल्हा नगरविकास सेलचे नियोजन संचालक ईश्वर उळागड्डी, निसार अहम्मद आदी उपस्थित होते.