वृत्तसंस्था/ भोपाळ
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या पुरूष हॉकी संघाने पटकावलेल्या कांस्य पदकामुळे या संघातील मध्यप्रदेशचा हॉकीपटू विवेक सागरला पोलीस खात्यामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश शासनाने विवेक सागरची पोलीस उप आयुक्तपदी नियुक्ती केली असून नियुक्तीचे लेखी पत्र राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अधिकृत मान्यतेने विवेक सागरला पाठविण्यात आले. ऑलिंपिक स्पर्धेतील भारतीय पुरूष हॉकी संघाच्या शानदार कामगिरीमुळे मध्यप्रदेश शासनातर्फे विवेक सागरला 1 कोटी रूपयांचा धनादेश यापूर्वीच देण्यात आला असून शासकीय नोकरीचे अभिवचन मध्यप्रदेश शासनाकडून पूर्ण करण्यात आले आहे. विवेक सागरच्या कुटुंबीयासाठी शासनातर्फे निवासस्थानही उपलब्ध करून देण्यात आले आहे.