ऑस्ट्रेलियाने महिलांच्या 4ƒ100 मीटर्स फ्री स्टाईल रिलेमध्ये नवा विश्वविक्रम रचत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. ब्रॉन्टे व केट या कॅम्पबेल भगिनींनी प्रारंभी उत्तम आघाडी प्राप्त केली आणि त्यानंतर मेग हॅरिस व इम्मा मॅकॉन यांनी त्यावर कळस चढवला. या संघाने 3 मिनिटे 29.69 सेकंद वेळेत रिले पूर्ण करत नवा विश्वविक्रम आपल्या खात्यावर केला.
ऑस्ट्रेलियन संघाने यावेळी 2018 मधील आपलाच विक्रमही मोडीत काढला. कॅनडाने 3 मिनिटे 32.78 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करत रौप्य जिंकले तर अमेरिकाने 3 मिनिटे 32.81 सेकंद वेळेसह कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली. अमेरिकेसाठी हे दिवसभरातील एकूण सहावे पदक होते. अमेरिकेच्या सिमॉन मॅन्युएलने अँकर लेग पार करत संघाच्या कांस्यपदकावर शिक्कामोर्तब करुन दिले.