वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार रॅशेल हेन्स हिला स्नायू दुखापत झाल्याने ती भारताविरूद्ध होणाऱया एकमेव कसोटी आणि तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी उपलब्ध होवू शकणार नाही.
उपकर्णधार हेन्सला भारताविरूद्ध झालेल्या तिसऱया वनडे सामन्यात खेळताना ही दुखापत झाली होती. येत्या गुरूवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकमेव दिवस-रात्रीचा कसोटी सामना कॅरेरा येथे खेळविला जाणार आहे. या सामन्यानंतर या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. हेन्सची स्नायू दुखापत बरी होण्यासाठी काही कालावधी लागेल, असे ऑस्ट्रेलियन महिला संघाचे प्रशिक्षक मॉट यांनी सांगितले.