वृत्तसंस्था/ भोपाळ
हॉकी इंडियाच्या 12 व्या वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात ओडिशा संघाने हिमाचल प्रदेशचा 8-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.
शुक्रवारी झालेल्या या स्पर्धेतील ह गटातील शेवटच्या सामन्यात ओडिशा संघाने हिमाचलप्रदेशवर 8-0 असा एकतर्फी विजय मिळवीत शेवटच्या आठ संघांत स्थान मिळविले. दुसऱया एका सामन्यात केरळने तेलंगणाचा 8-0 त्याचप्रमाणे ग गटातील सामन्यात दिल्लीने गोवा संघाचा 5-1 असा पराभव केला. दरम्यान हे विजय मिळवूनही केरळ आणि दिल्ली संघाला उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही. शनिवारी या स्पर्धेत महाराष्ट्र आणि झारखंड तसेच हरियाणा व उत्तरप्रदेश, पंजाब व कर्नाटक, मध्यप्रदेश व ओडिशा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचे सामने होतील.