ऑनलाईन टीम / मुंबई :
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री कंगना रनौतने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून वांद्रे कोर्टाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून कंगना ने बॉलीवुड आणि एका समाजाविरोधात वक्तव्य केली होती. तसेच सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशी याचिका मोहम्मद अश्रफुल्ला सय्यद नावाच्या व्यक्तीने केली आहे. यावेळी कंगनाचे ट्विट, व्हिडियो यांनी कोर्टात सादर केले होते. त्यानंतर कोर्टाने आज कंगनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.
याबाबत आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले असून याबाबतचे पुरावे कोर्टात सादर केले जातील आणि त्यानंतरच कोर्टाच्या आदेशानुसार, पुढील कारवाई केली जाईल.