उत्साह नवी भरारी घेतोय
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत एका मागोमाग एक अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे. अलिकडेच विदेशात ‘धाकड’चे चित्रिकरण संपवून आलेल्या कंगनाने स्वतःच्या प्रॉडक्शनचा चित्रपट ‘टीकू वेड्स शेरू’चे काम सुरू केले होते. तर अभिनेत्रीने आता मुंबईत ‘तेजस’ चित्रपटाच्या चित्रिकरणात भाग घेतला आहे.
स्वतःची पुढील मोहीम ‘तेजस’मध्ये सामील झाली आहे. माझ्या उत्कृष्ट टीममुळे उत्साह नवी भरारी घेत असल्याचे कंगनाने सोशल मीडियावर नमूद केले आहे. चित्रिकरणाच्या सेटवरून समोर आलेल्या छायाचित्रामध्ये कंगना रनौत वैमानिकाच्या गणवेशात दिसून येत आहे. रॉनी स्क्रूवालाकडून निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन सर्वेश मेवारा यांनी केले आहे.
यापूर्वी मार्च महिन्यात अभिनेत्रीने बीकानेरच्या चुरुमध्ये 4 दिवसांपर्यंत चित्रपटाचे शूटिंग केले होते. अभिनेत्री या चित्रपटात वायुदलाच्या वैमानिकाची भूमिका साकारत आहे. कंगनाचा ‘थलाइवी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात कंगनाने जयललितांची व्यक्तिरेखा साकारली आहे. याचबरोबर ती धाकड, इमर्जन्सी यासारख्या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.