वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
शेतातील विहिरीवरील विद्युत स्टार्टर पेटीमध्ये विद्युत प्रवाहाचा धक्का लागून कंग्राळी बुद्रुक येथील शेतकऱयाचा मृत्यू झाला.
मारुती रामचंद्र पवार (वय 45) असे दुर्दैवी शेतकऱयाचे नाव असून सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.
मारुती यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. मारुती सोमवारी सकाळी 10 वाजता शेतातील भाजीपाल्याला पाणी पाजण्यासाठी गेले होते. गावाजवळील त्यांच्या शेतामध्ये विहीर आहे. पंपसेट सुरू करण्यासाठी विद्युत स्टार्टर पेटीचे झाकण उघडताच विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा हॉस्पिटलला नेणण्यात आले. परंतु डॉक्टरांनी मारुतीला मृत घोषित केले. शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.