एप्रिलमध्ये 12.4 टक्क्मयांची घट : डिझेल निर्यातीत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिलली
कोविड 19 चा संसर्ग आणि लॉकडाऊनच्या नियमामुळे आर्थिक प्रवासाचा वेग मंदावलेला आहे. याचाच परिणाम देशातील आयात क्षेत्रावरही पडलेला आहे. एप्रिल 2020 मध्ये देशातील कच्च्या तेलाची आयात 12.4 टक्क्मयांनी घसरली आहे, अशी माहिती पेट्रोलियम प्लॅनिग ऍण्ड ऍनालिसिसच्या संकेतस्थळावरील उपलब्ध आकडेवारीमधून स्पष्ट झाली आहे.
याशिवाय या कालावधीत 17.28 दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात झाली आहे. मागील आकडेवारीच्या तुलनेत जून 2019 च्या कच्च्या तेलाच्या आयातीनंतर 10 महिन्यांनी सर्वात मोठी घसरण झाली आहे.
इंधनाच्या मागणीत घट
एप्रिल 2020 मध्ये अन्य तेल उत्पादनांची आयात 6.5 टक्क्यांनी घसरली आहे. त्याचप्रकारे याच काळात अन्य तेल उत्पादनाची आयात 3.35 दशलक्ष टन इतकी झाली आहे. वार्षिक तुलनेत ही घसरण मागील 16 महिन्यातील मोठी घसरण असल्याचे नोंदवण्यात आले आहे. याच कारणामुळे एप्रिलमध्ये देशातील इंधनाची मागणी 45 टक्क्मयांनी घसरली आहे.
रिफाईंड उत्पादन निर्यातीत वाढ एप्रिल 2020 मध्ये रिफाईंड उत्पादनाची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत 37 टक्क्मयांनी वाढली आहे. वर्षाच्या तुलनेत भारताने 6.04 दशलक्ष रिफाईंड उत्पादनांची निर्यात केली आहे. यामध्ये डिझेलची निर्यातही 68 टक्क्यांनी वधारली आहे.