लालासाहेब दडस / दहिवडी :
‘शब्दांनी ज्ञान वाढविणाऱ्या जगण्यातून जीवन घडविणाऱया मुल्यातून तत्वे शिकविणाऱ्या व समाजाला योग्य दिशा दाखविणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बिजवडीच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका रेखाताई प्रल्हाद पवार याच्यांविषयी थोडक्यात शब्दप्रपंच….’
प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाला मोलाचे स्थान आहे. आईनतंर शिक्षक हाच विद्यार्थ्याचा पहिला गुरु असतो. त्यामुळे समाजात आजही तितकेच आधाराचे स्थान आहे. अशा गुणी शिक्षकांच्या कार्याची दखल समाज नेहमीच घेतो. त्यातीलच एक शिक्षकरत्न म्हणजे आदर्श मुख्याध्यापिका रेखाताई प्रल्हाद पवार या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बिजवडी येथे कार्यरत आहेत.
रेखाताईंचे शिक्षण एम. ए. अर्थशास्त्र एम. ए. मराठी बी. एड. डी. एस. एम. तसेच माण तालुक्यातील राणंद हे जन्मगाव वडील गोविंदराव शिंदे सर माजी जिल्हा परिषद सदस्य घरातील वातावरण व्यक्तिस्वातंत्र्याचे मोठे भाऊ डॉ. प्रदीपकुमार शिंदे जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था, छोटे दोन्ही भाऊ शेती करतात, धाकटी बहीण सिद्धनाथ हायस्कूल म्हसवड येथे पर्यवेक्षिका म्हणून काम करते. पती प्रल्हाद पवार माजी प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय व जुनिअर कॉलेज दहिवडी आणि संचालक दि रयत को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा. थोरले दीर व मधले दीर दोघेही मुख्याध्यापक. दोन्ही मुले उच्च विद्याविभूषित आहेत. असा दोन्ही घरातून शैक्षणिक व सामाजिक कार्याचा वारसा मिळाला आहे. माझ्या आईने मला शिक्षण घेण्यासाठी खूप प्रेरणा दिली. मी सदैव तिच्या ऋणात राहीन.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण राणंद या गावी व महाविद्यालयीन शिक्षण दहिवडी, सातारा, तासगाव या ठिकाण झाले. फार थोडी अशी भाग्यवान माणसे असतात की त्यांना आपल्या गावाची सेवा करायला मिळते. मला ही सेवा पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काढलेल्या माझ्या गावातील हायस्कूलमध्ये मिळाली. मी प्रथम कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करते. 11/8/86 रोजी राणंद येथे पंडित नेहरू विद्यालय उपशिक्षिका म्हणून हजर झाले. गावात दोन वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. 1988 साली महात्मा गांधी विद्यालय दहिवडी तेथे बदली झाली.
महात्मा गांधी विद्यालयात स्कॉलरशिप परीक्षेला मार्गदर्शन केल्याने परीक्षेचा उत्कृष्ट निकाल, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा या स्पर्धेतून अनेक विद्यार्थ्यांची जिल्हा व राज्यस्तरावर निवड. 2010 ते 2020 या काळात माण तहसील कार्यालयाच्या ध्वजारोहण. दहिवडी नगरपंचायत महिला मेळाव्यात उस्फुर्त सहभाग, पाणी फाउंडेशन कार्याला मदत, महिला मेळावा, मराठी भाषा दिनानिमित्ताने व्याख्यान दिली आहेत. माध्यमिक शिक्षक संघटनेच्या महिला प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. मराठी साहित्य परिषद सदस्य दहिवडी या शाखेच्या स्थापनेपासून आजपर्यंत विविध कार्यक्रमांसाठी सहकार्य. ग्रामस्वच्छता अभियान नगरपंचायत दहिवडी दरवर्षी सक्रिय सहभाग. महिला सबलीकरण भारतीय जैन संघटना व रयत शिक्षण संस्था सातारा राज्य ट्रेनर प्रशिक्षण पूर्ण आत्तापर्यंत सहाशे विद्यार्थीनींना प्रशिक्षण दिले आहे. दहावी मराठी विषयाचा शंभर शंभर टक्के निकाल. मराठी विषयात बोर्डात प्रथम विद्यार्थिनी विद्यालयाच्या सर्वांगिण विकासामध्ये सक्रिय सहभाग.
आतापर्यंत मिळालेले पुरस्कार
दहिवडी नगरपंचायत कर्तबगार महिला पुरस्कार. माण तहसील कार्यालय आदर्श शिक्षिका पुरस्कार, सातारा भारत स्काऊट गाईड आदर्श शिक्षिका जिल्हा पुरस्कार. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचा कृतिशील शिक्षिका जिल्हा पुरस्कार.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन व कार्यवाही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात सहभाग. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड राज्य मंडळ सभासद म्हणून काम केले आहे. माण तालुक्यातील स्काऊट गाईड संपर्क अधिकारी म्हणून हे उत्कृष्ट काम केले आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी काही तरी करावे, म्हणून त्यागमूर्ती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्श प्रमाणे आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम प्रामाणिकपणे त्या आजही करीत आहेत. त्यांच्या या महान कार्यास ‘तरुण भारत’ परिवाराकडून खुप खुप शुभेच्छा.