बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ सुरूच आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची तितकीच गरज आहे. राज्यत आतापर्यंत ४० लाखाहून अधिक लोकांची कोरोना तपासणी केली गेली आहे.
गेल्या २४ तासात राज्यात ३२,९१३ जलद प्रतिजैविक आणि ३९,११७ आरटी-पीसीआर चाचण्यांसह एकूण ७२,०३० नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४०,५८,३१३ रुग्णांची तपासणी केली गेली आहे.
गेल्या 24 तासांत कर्नाटकात कोरोनाचे नऊ हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी राज्यात ९,३६६ नवीन रुग्णांची भर पडली तर ९३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच ७,२६८रुग्णांना कोरोनातून मुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात संक्रमित लोकांची एकूण संख्या ४,९४,३५६ वर पोहोचली आहे. यापैकी ३,८३,०७७ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. तर राज्यात १,०३,६३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ८०५ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ७,६२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यूचे प्रमाण १.५४ टक्के होते आणि रुग्ण बरे होण्याचा दर ७७.४९ टक्के होता.