बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात डिसेंबरमध्ये शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालये सुरू होणार नाहीत असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. दरम्यान सोमवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी भेट घेतल्यानंतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेश कुमार यांनी ही घोषणा केली.
कोविड तांत्रिक सल्लागार समिती (टीएसी) चे अध्यक्ष व इतर सदस्य तसेच आरोग्य विभाग, ग्रामविकास, पंचायत राज विभाग आणि आरोग्य विभागाचे अधिकारी यांची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली.
तांत्रिक तज्ज्ञांच्या समितीच्या सल्ल्यानुसार, शाळा पुन्हा सुरू करायच्या झाल्यास डिसेंबरअखेरपर्यंत राज्यातील कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२१ मध्ये शाळा पुन्हा सुरू करण्याच्या संभाव्य तारखेचा निर्णय घेण्यासाठी डिसेंबरअखेर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, आणि त्यांनतर शाळा सुरु केल्या जातील असे मुख्यमंत्री म्हणाले.
बैठकीपूर्वी टीएसीने शाळा व पीयू महाविद्यालये न उघडण्याची शिफारस करीत डिसेंबरमधील राज्य सरकारला कोविड आढावा अहवाल सादर केला. अहवालाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यास मान्यता दिली.