प्रतिनिधी / बेंगळूर
कर्नाटकात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वेग कमी होत आहे. राज्यात पूर्ण लॉकडाऊन केल्यापासून कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. बुधवारी राज्यात १०,९५९ नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच वेळी, २०,२४६ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. तर १९२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २,१५,५२५ इतकी आहे.
दरम्यान बुधवारी राज्यात सकारात्मकतेचा दर ६.६८ टक्के होता. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बेंगळूर शहरी जिल्ह्यात बुधवारी २,३९५ नवीन रुग्ण आढळले आहेत. याच ६,१८५ रुग्ण कोरोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर जिल्ह्यात ५० संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.