बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात गेल्या २४ तासांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत किरकोळ वाढ झाली असून, नवीन रुग्णांसह राज्यात सध्या २५,१६९ रुग्ण उपचारात आहेत.
राज्यात गुरुवारी १,८४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर १,८०० रुग्णांनी कोरोनावर मात करत घरी परतले. तसेच राज्यात २६ जणांचा मृत्यू झाला.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार १९ नोव्हेंबर रोजी कोरोना सकारात्मकतेचा दर १.५६ टक्के होता. तर मृत्यूची संख्या १.४१ टक्के होती.
दरम्यान, गेल्या २४ तासात बेंगळूर शहरी जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात १,०४८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच ८८१ लोक बरे होऊन घरी परतले. दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३,६०,५८७ वर पोहचली आहे. त्यापैकी ३,३८,६८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सध्या १७,८५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ४,०४२ रुग्ण मरण पावले आहेत.