बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील ११७ तालुक्यांमधील ३०१९ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत मतदान सुरु आहे. निवडणूक आयोगाच्यामाहितीनुसार ४८,०४८ जागांसाठी १,१७,३८३. उमेदवार रिंगणात आहेत.
सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले आणि संध्याकाळी ५ वाजता समाप्त होईल. राज्य निवडणूक आयोगाने २२ आणि २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या दोन टप्प्यांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. दोन्ही टप्प्यात २.९६ कोटी मतदार ग्रामपंचायतीसाठी ९२,१२१ सदस्य निवडून देतील.
तब्बल ४५,१२८ मतदान केंद्रे उभारली जातील आणि निवडणुकांच्या देखरेखीसाठी सुमारे २.७ लाख मतदान अधिकारी तैनात केले जातील, असे निवडणूक आयोगाने सांगितले.