बेंगळुरू / प्रतिनिधी
कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली असुन मंगळवारी (२ नोव्हेंबर) निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केला. सिंदगी मतदारसंघात भाजपने 31185 मतांनी विजय मिळवला, तर काँग्रेसने 7373 मतांनी हनगल मतदारसंघ जिंकला.
सिंदगीमध्ये भाजपचे भुसनूर रमेश बाळाप्पा यांनी ९३३८० मते मिळाली तर काँग्रेसचे अशोक मल्लाप्पा मनागुली यांना ६२२९२ मते मिळाली . हंगलमध्ये काँग्रेसचे माने श्रीनिवास 87300 मतांनी विजयी झाले असून भाजपच्या शिवराज शरणप्पा सज्जनार यांना 79874 मते मिळाली आहेत.
दोन्ही विधानसभा जागांवर JD(S) दोन आघाडीच्या पक्षांपेक्षा खूप मागे होता. सिंदगीत जेडी(एस) चे आमदार एम.सी. मनागुली आणि हंगल येथील भाजपचे सी.एम.उदासी यांच्या निधनानंतर जागा रिक्त झाल्यामुळे पोटनिवडणूक झाली होती.