बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना महामारी सुरु झाल्यापासून कर्नाटकात पहिल्यांदाच बुधवारी एका दिवसात ५० हजाराहून अधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तर राज्यात बुधवारी कोरोनाचे ७,८८३ नवीन रुग्ण सापडले आहेत.
वैद्यकीय शिक्षणमंत्री सुधाकर यांनी बुधवारी कर्नाटकात ५३,३२६चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत आम्ही राज्यात १०० प्रयोगशाळांमध्ये १८,२६,३१७ चाचण्या घेतल्या असल्याची माहिती दिली.
यापैकी२६,०७६ रॅपिड अँटिजेन टेस्ट होत्या तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाने २७,२५० आरटी-पीसीआर व इतर पद्धती अंतर्गत वर्गीकृत केले होते.
यापूर्वी, पंतप्रधान मोदींना घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कर्नाटकच्या शिष्टमंडळाने ७५ हजार चाचण्यांचे लक्ष्य आहे. याविषयी राज्याच्या निर्णयाची माहिती दिली.