बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये बुधवारी १,२४० नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. राज्यात कोरोनातून बरे होऊन १,४०३ रुग्ण रुग्णालयातून घरी परतले आहेत. सोमवारी एकूण ६ कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ११,९७१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १५,४७६ आहे.
दरम्यान राज्यात सध्या बेंगळूरमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. बुधवारी जिल्ह्यात ६७६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर ७९२ रुगणांनी कोरोनावर विजय मिळवत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला. तसेच ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ४,२४५ जणांनाच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या जिल्ह्यात १०,४२२ रुग्ण उपचार घेत आहेत.